मुंबई : मुंबईला २०३० पर्यंत रेबीजमुक्त करण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा संकल्प आहे. याकरिता २०२३ पासून आतापर्यंत १ लाखांहून अधिक श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच पालिका क्षेत्रात लसीकरण सुविधेसाठी १६३ आरोग्यसंस्थांमध्ये अँटी-रेबीज लसीकरण केंद्रे सेवेत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रेबीजसंबंधी लसीकरण आणि उपचार सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी 'वर्ल्ड रेबीज डे' साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट रेबीजविषयी जनजागृती करणे आणि रोगाच्या नियंत्रणातील प्रगती अधोरेखित करणे असे आहे. रेबीज दिनाच्या औचित्याने जागतिक स्तरावर आयोजन केले जाते.
श्वान चावल्यावर घ्यावयाची काळजी
जखम साबण व स्वच्छ पाण्याने १५ मिनिटे धुणे
हळद, तेल, चुना इत्यादी काहीही लावू नये
वैद्यकीय सल्ल्यानुसार अँटी-रेबीज लसीकरण पूर्ण करा
आपल्या पाळीव प्राण्यांना नियमितपणे लस द्या