Mumbai : ‘डोंगरीचा राजा’, ‘धारावीचा चिंतामणी’चे उत्साहात आगमन; ढोल-ताशांचा गजर, भाविकांची गर्दी

१४ सप्टेंबरला लाडक्या बाप्पाची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
Mumbai : ‘डोंगरीचा राजा’, ‘धारावीचा चिंतामणी’चे उत्साहात आगमन; ढोल-ताशांचा गजर, भाविकांची गर्दी
Mumbai : ‘डोंगरीचा राजा’, ‘धारावीचा चिंतामणी’चे उत्साहात आगमन; ढोल-ताशांचा गजर, भाविकांची गर्दी
Published on

मुंबई : १४ सप्टेंबरला लाडक्या बाप्पाची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात प्रतिष्ठापना केली जाणार आहे. बाप्पाच्या प्रतिष्ठापनेला काही दिवसच शिल्लक असून रविवार, ३० ऑगस्टला लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात ताडदेवचा राजा, डोंगरीचा राजा, धारावीचा चिंतामणीचे उत्साहात आगमन झाले. यावेळी बाप्पाची एक झलक मोबाईल कॅमेरात कैद करण्यासाठी परळ, लालबाग, दादर, भायखळा आदी मार्ग गणेश भक्तांनी फुलून गेले होते.

लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. शनिवार व रविवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पांचे आगमन होते. जोगेश्वरीचा राजा, गोरेगावचा राजा, करी रोडचा राजा, कुलाब्याचा महाराजा, खेतवाडीचा चिंतामणी, अंधेरीचा सम्राट, मीरा-भाईंदरचा राजा, भिवंडीचा चिंतामणी अशा ४० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे जयघोषात आगमन झाले.

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांत बाप्पाचा आगमन सोहळा दोन आठवड्यांआधीपासूनच सुरू झाला आहे. रविवार, ३० ऑगस्ट रोजी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणरायांचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मुंबई महापालिकेने अधिकारी, बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी व मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in