Mumbai : डोंगरीतील लॅम्बट इमारत जप्त; ED ची कारवाई; दाऊदच्या नावे धमकी देत मालमत्ता सलीम फ्रूटच्या पत्नीच्या नावे केल्याचा आरोप

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातील लॅम्बट इमारत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे.
Mumbai : डोंगरीतील लॅम्बट इमारत जप्त; ED ची कारवाई; दाऊदच्या नावे धमकी देत मालमत्ता सलीम फ्रूटच्या पत्नीच्या नावे केल्याचा आरोप
Mumbai : डोंगरीतील लॅम्बट इमारत जप्त; ED ची कारवाई; दाऊदच्या नावे धमकी देत मालमत्ता सलीम फ्रूटच्या पत्नीच्या नावे केल्याचा आरोपसंग्रहित छायाचित्र
Published on: 

आशीष सिंह

मुंबई : दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातील लॅम्बट इमारत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. कुख्यात गुंड छोटा शकीलचा मेहुणा मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट याने दाऊद इब्राहिम टोळीच्या नावाने धमक्या देऊन आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे ही मालमत्ता पत्नीच्या नावावर केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

या प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून केंद्रीय तपास यंत्रणेने बिल्डर अस्लम अब्दुल रहमान पटणी आणि अन्य आरोपींच्या बँक खात्यांमधील शिल्लक रक्कमही जप्त केली आहे. जप्त केलेल्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे चार कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ईडीच्या म्हणण्यानुसार, शब्बीर करोलिया आणि युसूफ करोलिया यांनी संगनमत करून मूळ मालक असल्याचे भासवत ही मालमत्ता बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्याचा कट रचला. त्यासाठी विविध बनावट कागदपत्रे तयार केली. त्यानंतर ही मालमत्ता सलीम फ्रूटची पत्नी शाझिया सलीम इक्बाल कुरेशी हिच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेतील एका व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला.

खंडणीच्या माध्यमातून मालमत्ता बळकावली

ईडीच्या मते, मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी केलेल्या व्यवहारांची रचना अशी केली की, संपूर्ण व्यवहार कायदेशीर असल्याचे भासावे. मात्र, प्रत्यक्षात ही मालमत्ता खंडणी आणि धमक्यांच्या माध्यमातून बळकावण्यात आली आणि अखेरीस शाझिया हिच्या नावावर करण्यात आली, असा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)