Mumbai : एका कर्मचाऱ्याचे असेही ‘पडणे’; आधी मॅनहोलमध्ये, आता संशयाच्या भोवऱ्यात

मुसळधार पावसात महापौरांचा पाहणी दौरा सुरू असताना बुधवारी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला होता.
Mumbai : एका कर्मचाऱ्याचे असेही ‘पडणे’; आधी मॅनहोलमध्ये, आता संशयाच्या भोवऱ्यात
Mumbai : एका कर्मचाऱ्याचे असेही ‘पडणे’; आधी मॅनहोलमध्ये, आता संशयाच्या भोवऱ्यात(Photo-X)
Published on

मुंबई : मुसळधार पावसात महापौरांचा पाहणी दौरा सुरू असताना बुधवारी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला होता. तोच कर्मचारी गुरुवारीही पडला... फक्त यावेळी मॅनहोलमध्ये नव्हे, तर तो पडला संशयाच्या भोवऱ्यात. त्याच्या बुधवारच्या अपघाताबाबत महापौर रितू तावडे यांनी संशय व्यक्त केला असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते. पावसाचा जोर वाढला आणि महापौर रितू तावडे यांनी गांधी मार्केट परिसरात पहाणी केली. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागातील मुकादम बाबन सोना जाधव हे उघड्या नाल्यात पडले होते. काल दिवसभर वाहिन्यांवरून याची दृश्ये दाखवण्यात आल्याने देशभर त्याची चर्चा झाली.

आता मात्र महापौरांनी हा प्रकार "संशयास्पद" असल्याचे म्हटले आहे. महापौर तावडे म्हणाल्या की, नाल्याभोवती बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. एक सामान्य नागरिक त्या ठिकाणाहून सुरक्षितपणे चालत गेला, मग नाला उघडा असल्याची माहिती असलेला कर्मचारी त्यात कसा काय पडू शकतो याबाबत शंका निर्माण होते. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Mumbai : एका कर्मचाऱ्याचे असेही ‘पडणे’; आधी मॅनहोलमध्ये, आता संशयाच्या भोवऱ्यात
Mumbai : पहिल्याच पावसात पोलखोल! सखल भागात साचले पाणी; रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत; महापौरांच्या देखतच मुकादम पडला उघड्या मॅनहोलमध्ये

गांधी मार्केट परिसरात २३ आणि २४ जूनच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गुरुवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. घटनावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून, सुरक्षा उपाययोजना, कामकाजाची पद्धत आणि निर्धारित नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी केली जात आहे. चौकशी अहवालानंतर या घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहे. 

जाधव म्हणतात तो अपघातच

दरम्यान, बाबन जाधव यांनी आपण जाणूनबुजून नाल्यात पडलो नसून केवळ कर्तव्य बजावत असताना अपघात घडल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात चौकशी करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले.

logo
marathi.freepressjournal.in