Mumbai : पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त; टिकाऊ रस्त्यांसाठी ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर

पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरील खराब रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून यामुळे हा मार्ग दोन तासांत वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे.
Mumbai : पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त; टिकाऊ रस्त्यांसाठी ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर
Mumbai : पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त; टिकाऊ रस्त्यांसाठी ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर
Published on

मुंबई : पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरील खराब रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून यामुळे हा मार्ग दोन तासांत वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे. पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल १६४ कोटी ९४ लाख ६५ हजार ९९४ रुपये खर्च करणार आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावर वर्ष २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ असे मिळून एकूण ३ कार्यादेशांतर्गत मास्टिक वापरून दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. कुर्ला पूल, छेडा नगर पूल, एस.सी.एल.आर. पूल, घाटकोपर पूल, विक्रोळी पूल, जे. व्ही. एल. आर.पूल, ऐरोली जंक्शन पूल या पुलांची व इतर दुरवस्था झालेल्या पृष्ठभागाची मास्टिक वापरून सुधारणा करणे आदी कामे मान्सूनपूर्व तयारीअंतर्गत सद्य:स्थितीत चालू आहेत.

Mumbai : पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त; टिकाऊ रस्त्यांसाठी ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर
Mumbai : पूर्व, पश्चिम द्रुतगती महामार्ग होणार खड्डेमुक्त; मॅस्टिक डांबरचा वापर, पालिका करणार ५० कोटींचा खर्च

तसेच पूर्व द्रुतगती मार्गावरील मुख्य रस्त्यावरील खराब/दुरवस्था झालेल्या पृष्ठभागाची ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा करण्यात येणार आहे. ‘मायक्रो सर्फेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पूर्व द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त होईल आणि प्रवास सुखकर होणार आहे.

पूर्व द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी ७७ कोटी १४ लाख २९ हजार ९७३ रुपये खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवार, ६ मे रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

असा आहे पश्चिम द्रुतगती मार्ग

पश्चिम द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी २६ किलोमीटर असून, सरासरी रुंदी ४२ मीटर इतकी आहे.

असा आहे पूर्व द्रुतगती मार्ग

पूर्व द्रुतगती मार्गाची लांबी १९ किमी असून ६० मीटर रुंदी आहे, तर पश्चिम द्रुतगती मार्ग.

logo
marathi.freepressjournal.in