Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

सायबर फसवणुकीच्या उद्देशाने २२ बनावट खाती उघडून त्याद्वारे ७.४२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार करणाऱ्या एका टोळीचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस
Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस
Published on

मेघा कुचिक/मुंबई

सायबर फसवणुकीच्या उद्देशाने २२ बनावट खाती उघडून त्याद्वारे ७.४२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार करणाऱ्या एका टोळीचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपींनी टेलिग्रामद्वारे संपर्क साधून त्यांना ऑनलाइन कामाचे आमीष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

दोघांना अटक

तांत्रिक विश्लेषण, सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० आणि समन्वय पोर्टलच्या मदतीने पोलिसांनी बीड येथील डिलिव्हरी बॉय अविनाश खरात (२५) आणि पिंपरी-चिंचवड येथील डिलिव्हरी बॉय विकास भुजबळ (२४) या दोन आरोपींची ओळख पटवली. यापैकी अविनाश खरात याला अटक करण्यात आली असून विकास भुजबळ आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

देशभरात सायबर फसवणूक

पोलीस उपायुक्त मोहित कुमार गर्ग यांनी सांगितले, 'मुख्य आरोपीने इतर लोकांची मदत घेऊन ही खाती उघडली. खरातने पुण्याजवळ एक फ्लॅट खरेदी केला होता आणि त्या पत्त्याचा वापर करून २२ बनावट खाती उघडली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in