

मुंबई : मुंबईत बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघड झाला आहे. शहरात १० हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्र वाटप झाले असून यासाठी कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.
मुंबईत ८७,३४८ बनावट जन्म प्रमाणपत्र वाटपाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या प्रकरणाची चौकशीसाठी स्थापन केलेल्या एसआयटीला माहिती सादर करण्यात येणार आहे.
पालिकेच्या सर्व २६ वॉर्डांमधून एकूण ८७ ३४७ जन्म प्रमाणपत्रे वाटप झाल्याने आरोग्य विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ई, एल, भायखळा, गोवंडी आणि देवनार परिसरात जन्म प्रमाणपत्र वाटपात अनियमितता झाल्याचे प्राथमिक तपासात आढळले. याची गंभीर दखल घेत महापौर रितू तावडे यांनी आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.
‘सॅप’ प्रणालीतून झाला मोठा खेळ?
बंद झालेल्या ‘सॅप’ प्रणालीचा वापर करून ८७ हजार ३४७ जन्म प्रमाणपत्रे जारी केल्याचा आरोप होत आहे. त्याच काळात नव्या सीएसआर पोर्टलवर ३३७७२ नोंदी करण्यात आल्या. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या प्रणालींमधून नोंदी आणि प्रमाणपत्रे जारी झाल्याने हा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतातून झालेला मोठा घोटाळा असल्याचा आरोप भाजप नेत्याने केला होता. त्यानंतर चौकशी सुरू झाली.