Mumbai : मुलाच्या हत्या प्रकरणातून वडिलांची निर्दोष मुक्तता; तपासात गंभीर त्रुटी, कोणतेही ठोस पुरावे नाहीत

मुलाची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असलेल्या ४४ वर्षीय सांताक्रूझ येथील रहिवाशाची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
Mumbai : मुलाच्या हत्या प्रकरणातून वडिलांची निर्दोष मुक्तता; तपासात गंभीर त्रुटी, कोणतेही ठोस पुरावे नाहीत
Mumbai : मुलाच्या हत्या प्रकरणातून वडिलांची निर्दोष मुक्तता; तपासात गंभीर त्रुटी, कोणतेही ठोस पुरावे नाहीत (संग्रहित छायाचित्र)
Published on

प्रणाली लोटलीकर/मुंबई

मुलाची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असलेल्या ४४ वर्षीय सांताक्रूझ येथील रहिवाशाची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीविरोधातील हत्येचे आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरला. सरकारी पक्ष संशयापलीकडे जाऊन गुन्हा सिद्ध करू शकला नाही आणि या संपूर्ण तपासात गंभीर त्रुटी राहिल्या, असे न्यायालयाने १५ पानांच्या निकालात स्पष्ट केले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांनी दिनेश रामकुमार गुप्ता यांची निर्दोष मुक्तता केली. दिनेश गुप्ता यांच्यावर २४ मार्च २०२४ रोजी त्यांचा मुलगा आलोक गुप्ता याच्या हत्येप्रकरणी हत्या आणि हेतुपुरस्सर अपमान अंतर्गत खटला चालवला जात होता. हे प्रकरण ‘दर्द से हमदर्द तक’ या स्वयंसेवी संस्थेने हाताळले असून ॲडव्होकेट श्रीराम चिंदरकर यांनी या संस्थेच्या वतीने आरोपीची बाजू मांडली.

सरकारी पक्षाच्या दाव्यानुसार, वाकोला येथील राहत्या घरी झालेल्या वादानंतर गुप्ता यांनी मुलाच्या पोटात सुऱ्याने वार केले होते. यात गंभीर जखमी झालेल्या आलोकचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.

मुख्य साक्षीदार आणि कुटुंबाचा पाठिंबा नाही

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाची मुख्य साक्षीदार असलेली तक्रारदार आणि आरोपीची मुलगी प्रीती गुप्ता हिने न्यायालयात दिलेली साक्ष फिर्यादीच्या बाजूने गेली नाही. आपण आणि आपले वडील एकत्र घरी परतलो असता भाऊ आलोक आधीच रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला आढळला, असे तिने सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in