Mumbai : ९ वर्षांच्या मुलाला इस्त्रीचे चटके, मारहाण; वडिलांविरोधात गुन्हा दाखल

एका ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलास इस्त्रीचे चटके देणे, मारहाण करणे असा छळ करणाऱ्या बापावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवघर पोलीस ठाणे (संग्रहित छायाचित्र)
नवघर पोलीस ठाणे (संग्रहित छायाचित्र)
Published on

भाईंदर : एका ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलास इस्त्रीचे चटके देणे, मारहाण करणे असा छळ करणाऱ्या बापावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा रोडच्या दीपक हॉस्पिटल मार्गावरील जुपिटर इमारतीत राहणार धीरज शर्मा (३३) यांच्या पत्नीचे निधन झाले असून त्यांनी त्यांच्या मुलास मथुरा-वृंदावन येथील निवासी शाळेत ठेवले आहे. त्यांचा ९ वर्षांचा मुलगा हा डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान सुट्टीच्या काळात वडिलांकडे राहायला आला होता. वडिलांकडे राहून तो पुन्हा वृंदावन येथील शाळेत गेला.

शिक्षकांच्या विचारपुशीनंतर उघड झाला प्रकार

शाळेतील शिक्षकांनी जेव्हा ९ वर्षांच्या चिमुरड्यावर चटके आणि मारहाणीचे डाग पाहून त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने वडिलांनी केलेल्या अमानुष छळाचा पाढा वाचला. शिक्षकांनी मुलाच्या आईची आई अर्थात आजीला कॉल करून बोलावून घेतले. अखेर नवघर पोलीस ठाण्यात २३ फेब्रुवारीला सायंकाळी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून शर्मा विरुद्ध अल्पवयीन बाल कायदा आणि कलमांनुसार गुन्हा दाखल केला. आई नाही त्यात वडिलांपासून लांब एकट्या राहणाऱ्या ९ वर्षांच्या चिमुरड्यावर वडिलांनीच केलेल्या अत्याचाराच्या प्रकाराने हळहळ तसेच संताप व्यक्त होऊ लागला.

logo
marathi.freepressjournal.in