

मुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी धडक कारवाई केली आहे. ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी राज्यभरात राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान २९ आस्थापना आणि वाहनांमधून सुमारे १७,८२४ किलो अन्नपदार्थ मत ६३.०९ लाख) जप्त त आले असून ४३ अन्न यिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत मिठाई, खवा-मावा, पनीर, फरसाण, फराळ, सुकामेवा व खाद्यतेल यांचा व्यवसाय करणाऱ्या ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
पाच प्रकरणांची नोंद; ७० हजारांचा दंड
बोरिवली आणि भांडुप येथे 'फूड सेफ्टी अँड स्टैंडर्ड्स रेग्युलेशन्स, २०११'च्या अनुसूची ४ आणि इतर तरतुदींच्या उल्लंघनाखाली कलम ६९ अंतर्गत पाच प्रकरणे नोंदवण्यात आली असून एकूण ७० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
खरेदीची बिले सादर करण्यात अपयशी
तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे अनेक गंभीर उल्लंघन आढळून आले. यामध्ये अस्वच्छ वातावरणात उत्पादन आणि साठवणूक करणे, खिडक्यांना जाळ्या (वायर मेश) न असणे, कीटक नियंत्रणाचा (पेस्ट कंट्रोल) अभाव आणि एफएसएमएस (एफएसएमएस) व फोस्टैंक नोंदी न ठेवणे यांचा समावेश आहे. तसेच अनेक आस्थापना पाणी चाचणी अहवाल, कामगारांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि खरेदीची बिले सादर करण्यात अपयशी ठरल्या.
नाशवंत अन्नपदार्थ केले नष्ट
जप्त केलेल्या साठ्यामध्ये खवा, मावा, पनीर, पेढा, कुंदा, कलाकंद, काजू कतली, बर्फी, हलवा, चकली, चिवडा, नमकीन, बदाम, अंजिर, तूप, रिफाइंड सोयाबीन तेल आणि पामोलिन तेल यांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करू शकणारे नाशवंत अन्नपदार्थ पंचांच्या समक्ष जागीच नष्ट करण्यात आले.
विविध अन्नपदार्थही जप्त
कनिष्ठ दर्जाचा संशय आणि अस्वच्छतेमुळे एफडीएने राज्याच्या सातही विभागांमधून ड्रायफ्रूट रोझ बॉल्स, ब्लूबेरी ड्रायफ्रूट प्रॉडक्ट्स, शेव, मोतीचूर लाडू, बेसन वडी, बालूशाही, अनारसे, शंकरपाळे आणि चकली यांसारखे विविध अन्नपदार्थही जप्त केले आहेत.
सगळ्या आस्थापनांवर कारवाई होणार
आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले की, अन्न व्यवसाय लहान असो वा मोठा, एफडीए कडक कारवाई सुरूच ठेवेल. ब्रँड मोठा असो वा लहान, नियम सर्वांसाठी सारखेच आहेत आणि कारवाई तितकीच कडक असेल.