Mumbai : बँक्वेट हॉलला आग; कोणीही जखमी नाही, Video

कांदिवली पश्चिम येथील स्टेशन रोडवरील अभिराई हॉटेलजवळील तळ अधिक चार मजली तिरुपती बँक्वेट आहे.
Mumbai : बँक्वेट हॉलला आग; कोणीही जखमी नाही, Video
Mumbai : बँक्वेट हॉलला आग; कोणीही जखमी नाही, Video(Photo-X)
Published on

मुंबई : कांदिवली पश्चिम येथील स्टेशन रोडवरील अभिराई हॉटेलजवळील तळ अधिक चार मजली तिरुपती बँक्वेट आहे. सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. काही वेळात इमारतीत धुराचे लोट पसरले आणि ११ जण अडकले. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि अडकलेल्या ११ जणांना पायऱ्यांनी सुखरुप बाहेर काढले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कांदिवली पश्चिम येथील स्टेशन रोडवरील अभिराई हॉटेलजवळील तळ अधिक चार मजली तिरुपती बँक्वेट आहे. बेसमेंट, तळमजला आणि चार मजले असलेल्या व्यावसायिक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील तिरुपती बँक्वेटमध्ये आग लागल्याची घटना घडली.

सुमारे ५० चौरस फूट परिसरातील कपडे, लाकडी फर्निचर, फॉल्स सिलिंग आदी साहित्य आगीत स्वाहा झाले. तसेच इमारतीच्या बाहेरील भागातील अॅल्युमिनियम व प्लास्टिकच्या सजावटीच्या पत्र्यांनाही आगीची झळ बसली. आगीमुळे संपूर्ण इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच बचावकार्य हाती घेत दुसऱ्या मजल्यावरील लॉजिंग हाऊसमधील ११ जणांना जिन्याच्या मार्गाने सुरक्षित बाहेर काढले. अथक प्रयत्नांनंतर सकाळी ६.०७ वाजता आग पूर्णपणे विझवण्यात आली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून अग्निशमन दलाचे अधिकारी व स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in