मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक

जिवाची पर्वा न करता चेंबूरजवळ ४० ते ५० फूट उंचीवर बिघाड झालेल्या मोनोरेलमधील ५८२ प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाच्या १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झाले आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक
मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदकप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : जिवाची पर्वा न करता चेंबूरजवळ ४० ते ५० फूट उंचीवर बिघाड झालेल्या मोनोरेलमधील ५८२ प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाच्या १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झाले आहे. मोनोरेलमधील प्रवाशांच्या सुटकेसाठी दलाच्या जवानांनी प्रवाशांची सुटका केली होती.

शौर्यपदक जाहीर झालेले अधिकारी-कर्मचारी :

रवींद्र अंबुलगेकर-प्रमुख अग्निशमन अधिकारी, ए. व्ही. परब, एम. सावंत, आय. के. कांबळे, वाय. एच. पवार, डी. ए. भोसले, राजेश राणे, महेश गुडुलकर, रमेश कोळी, हर्षल कटके, चिंतामणी खांडेकर, विकी सरवदे, सुदर्शन पावडे

पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने महाराष्ट्रातील उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला आहे. या पुरस्कारांमध्ये राष्ट्रपती पोलीस पदक, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक आणि पोलीस शौर्य पदकांचा समावेश आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष रवींद्र जैन यांना 'उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक' जाहीर झाले. सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन देसाई, पोलीस उपनिरीक्षक दीपक धुमणे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम, स. पोलीस उपनिरीक्षक अंकुश न्यायांगनुणे आणि पोलीस अंमलदार भारत गोहील यांचा समावेश आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in