कांदिवलीतील निवासी इमरातील भीषण आग ; पाच जण जखमी

आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमरातीला भीषण आग लागल्याची घटना घडली.
कांदिवलीतील निवासी इमरातील भीषण आग ; पाच जण जखमी

मुंबई : मुंबईत इमरातींचा आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमरातीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग लेवल-१ ची असल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसारस ही आग ८ मजली इमरतीच्या पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग आणि इंस्टॉलेशन्सपर्यंत मर्यादित आहे. आग लागल्याची माहिती मिळताच बीएमसी, एमएफबी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दल्याच्या प्रयत्नांनी पवनधाम वीणा संतूर इमरातीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. त्याच बरोबर इमरातीला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. अग्निशमन दलाने कुलिंग ऑपरेशन सुरु केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in