Mumbai : पंचतारांकित हॉटेलात जेवणाच्या टेबलावर झुरळ; डॉक्टरांनी केला व्हिडिओ शेअर; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष

मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित (फाइव्ह स्टार) हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणादरम्यान एका प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञाच्या (कार्डियोलॉजिस्ट) टेबलावर चक्क झुरळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध डॉ. अशोक सेठ यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केले आहे.
Mumbai : पंचतारांकित हॉटेलात जेवणाच्या टेबलावर झुरळ; डॉक्टरांनी केला व्हिडिओ शेअर; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष
Mumbai : पंचतारांकित हॉटेलात जेवणाच्या टेबलावर झुरळ; डॉक्टरांनी केला व्हिडिओ शेअर; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष
Published on

मुंबई : मुंबईतील एका नामांकित पंचतारांकित (फाइव्ह स्टार) हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणादरम्यान एका प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञाच्या (कार्डियोलॉजिस्ट) टेबलावर चक्क झुरळ आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध डॉ. अशोक सेठ यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केले आहे.

डॉ. अशोक सेठ हे शनिवारी रात्री मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवत होते. यादरम्यान त्यांच्या ताटाजवळ एक लहान झुरळ फिरताना दिसले. डॉ. सेठ यांनी या झुरळाला गमतीने 'रोची' असे नाव दिले. डॉ. सेठ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (ट्विटर) व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, "बघा, अचानक आमच्यासोबत जेवायला कोण आले! 'रोची' नावाचे लहान झुरळ आमच्या टेबलावर आमचे जेवण शेअर करण्यासाठी आले होते. त्याला कदाचित पास्ताऐवजी पिझ्झा हवा असावा. पण यामुळे आमची भूकच उडाली आणि आम्ही तेथून निघून गेलो.

मुंढेंना टॅग

या घटनेनंतर डॉ. अशोक सेठ यांनी महाराष्ट्राचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे, एफएसएसएआय आणि त्या हॉटेलला टॅग केले. "सुदैवाने आपण तुकाराम मुंढे यांच्या कार्यक्षेत्रात आहोत आणि ते नक्कीच या प्रकरणात लक्ष घालतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणी हॉटेल प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in