मुंबईचे पदपथ घेत आहेत मोकळा श्वास; BMC चा डी, सी, ई विभाग झाला अतिक्रमणमुक्त

मुंबईतील ५० टक्के नागरिक पायीच प्रवास करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना मोकळे फुटपाथ देण्यासाठी पादचारी प्रथम अभियान राबविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
मुंबईचे पदपथ घेत आहेत मोकळा श्वास; BMC चा डी, सी, ई विभाग झाला अतिक्रमणमुक्त
मुंबईचे पदपथ घेत आहेत मोकळा श्वास; BMC चा डी, सी, ई विभाग झाला अतिक्रमणमुक्तX| @mybmc
Published on

मुंबई : मुंबईतील ५० टक्के नागरिक पायीच प्रवास करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना मोकळे फुटपाथ देण्यासाठी पादचारी प्रथम अभियान राबविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

पादचारी प्रथम अभियानांतर्गत परिमंडळ-१ मधील ‘डी’, ‘सी’ आणि ‘ई’ विभागाने राबविलेल्या संयुक्त कारवाईत मौलाना शौकत अली मार्गालगतच्या पदपथांवरील अनधिकृत बांधकामांचे बुधवारी निष्कासन करण्यात आले.

‘ई’ विभागात ०२ अनधिकृत दुकाने, ०६ तात्पुरते शेड, ४६ अनधिकृत अतिक्रमणांवर (ओटे, टेबल, फर्निचर इत्यादी) कारवाई करण्यात आली. 'सी’ विभागात ०५ अनधिकृत वाढीव बांधकामे / अतिरिक्त संरचना, ०४ अनधिकृत फुलांचे कट्टे / ओटे, ०२ पाण्याच्या टाक्या आणि ११ अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन करण्यात आले. 'डी’ विभागात १४ अनधिकृत वाढीव बांधकामे/ अतिरिक्त संरचना, १६ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, ०४ अनधिकृत फुलांचे कट्टे / ओटे, ०२ पाण्याच्या टाक्या, ११ अनधिकृत फेरीवाऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in