मुंबापुरी सज्ज! गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी; पुढील वर्षी १४ सप्टेंबरला बाप्पांचे आगमन

मुंबईसह राज्यात गेले १० दिवस गणेशोत्सवाची धूम सुरू होती. शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. मुंबईतील नावाजलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे शनिवारी विसर्जन होणार असल्याने ते सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य सरकार, मुंबई पालिका व पोलिसांनी काटेकोर नियोजन केले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईसह राज्यात गेले १० दिवस गणेशोत्सवाची धूम सुरू होती. शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. मुंबईतील नावाजलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे शनिवारी विसर्जन होणार असल्याने ते सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य सरकार, मुंबई पालिका व पोलिसांनी काटेकोर नियोजन केले आहे. त्यातच मुंबईत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा मिळाल्याने पोलीस यंत्रणेसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईतील चौपाट्या, विसर्जन स्थळे गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली आहेत. चौपाटीवर विशेषता गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली असून ८९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीला सामोरे जाणाऱ्या या पारंपरिक विसर्जन स्थळावर यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिरिक्त खबरदारी घेण्यात येणार आल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

विसर्जनासाठी किमान दहा अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३७उपायुक्त, ६२ सहाय्यक आयुक्त यांच्यासह २,९९० पोलीस अधिकारी आणि १७,५५८ अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रक पथक, डेल्टा, कॉम्बॅक्ट, अँटी ड्रोन पथक असा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त ते पोलीस शिपाई या पदांवरील एकूण तीन हजार मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय एनएसएस, नागरी संरक्षण दल, वाहतूक रक्षक, रस्ता सुरक्षा दल रक्षक, हॅम रेडियो, अनिरुद्धस अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, होमगार्ड, जलरक्षक दल असे चार हजार मनुष्यबळ तैनात असणार आहे. हा बंदोबस्त शनिवारी दुपारी बारा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत तैनात करण्यात येणार आहे.

या भागात वाहतूक कोंडीची शक्यता

गणेश विसर्जनाच्या दिवशी लालबाग, काळाचौकी, जी. डी आंबेकर रोड, श्रावण यशवंते चौक आणि त्याकडे जाणाऱ्या आसपासच्या भागात वाहतूककोंडी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी या दिवशी अत्यावश्यक काम नसल्यास ही ठिकाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मध्य रेल्वेची चार तर पश्चिम रेल्वेच्या बारा जुन्या तसेच धोकादायक पुलांवरून शंभरपेक्षा अधिक व्यक्ती विसर्जन मिरावणुकीवेळी जाणार नाहीत, तसेच पुलावर ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात येऊ नये आणि नृत्य करू नये, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तछायाचित्र : विजय गोहिल

अनंत चतुर्दशीला शुक्रवारी मुंबईत होणारा गणेश विसर्जन सोहळा सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. या दिवशी नागरिकांनी जास्तीतजास्त सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा आणि उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी जास्तीत जास्त कोस्टल रोडचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

एकूण ८४ रस्ते वाहतुकीस पूर्णपणे बंद

बंदोबस्त आणि वाहतूक नियमनासाठी ५२ निरीक्षण मनोरे आणि ध्वनिक्षेपक मनोरे उभारण्यात आले आहेत. दक्षिण मुंबई विभागात ३९ रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत. एक एकदिशा मार्ग असेल, तर ४१ रस्त्यांवर पार्किंगला बंदी करण्यात आली आहे. मध्य मुंबईत १९ रस्ते वाहतुकीस बंद असतील. आठ मार्ग एकदिशा असतील. १४ मार्गावर मालवाहू वाहनांना बंदी असेल, तर २३ मार्गावर वाहने उभी करण्यास मनाई असेल. शहरातील एकूण ८४ रस्ते वाहतुकीस पूर्णपणे बंद असतील.

logo
marathi.freepressjournal.in