Mumbai : कॉटन ग्रीन येथे १२०० वाहनांसाठी 'मेगा पार्किंग'; गणेशोत्सवासाठी ट्रॅफिक पोलिसांचे नियोजन

गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दिलासा देण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या (बीपीटी) सहकार्याने विशेष नियोजन केले आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईतील वाहतूककोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कॉटन ग्रीन येथे भव्य तात्पुरते वाहनतळ उभारण्यात येत आहे.
Mumbai : कॉटन ग्रीन येथे १२०० वाहनांसाठी 'मेगा पार्किंग'; गणेशोत्सवासाठी ट्रॅफिक पोलिसांचे नियोजन
Mumbai : कॉटन ग्रीन येथे १२०० वाहनांसाठी 'मेगा पार्किंग'; गणेशोत्सवासाठी ट्रॅफिक पोलिसांचे नियोजन'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पूनम अपराज/मुंबई

गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दिलासा देण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या (बीपीटी) सहकार्याने विशेष नियोजन केले आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईतील वाहतूककोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कॉटन ग्रीन येथे भव्य तात्पुरते वाहनतळ उभारण्यात येत आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून सुमारे १२०० वाहनांसाठी हे वाहनतळ उभारण्यात येत आहे.

लालबाग-परळ भागात उत्सव काळात सुमारे सव्वा ते दीड कोटी भाविक भेट देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वीकेंड आणि विसर्जनाच्या दिवशी होणारी तुफान गर्दी विचारात घेता, कॉटन ग्रीन येथील बीपीटीच्या रिकाम्या जागेवर प्रथमच सुमारे १२०० वाहनांच्या क्षमतेचे भव्य पार्किंग तयार केले जात आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी या मैदानाचे सपाटीकरण करून रात्रीच्या वेळी पुरेशा दिव्यांची व्यवस्था केली जात आहे.

मार्गदर्शनासाठी दिशादर्शक फलक

वाहतूक पोलिसांनी बीपीटी प्रशासनाकडे जागेची मागणी केली होती, ती मान्य करण्यात आली आहे. कॉटन ग्रीन येथील हे केंद्र उत्सव काळात पूर्णवेळ सुरू राहील. मुख्य रस्त्यांवर वाहनचालकांच्या मार्गदर्शनासाठी दिशादर्शक फलक लावण्यात येतील, अशी माहिती सह पोलीस आयुक्त (वाहतूक) सत्यनारायण चौधरी यांनी दिली.

स्वयंसेवकांची मदत

३,५०० वाहतूक पोलिसांच्या मदतीला विविध सामाजिक संस्थांचे ६ हजार स्वयंसेवक तैनात असती

डिजिटल फलक, ६ हजार स्वयंसेवक, ५५ वॉच टॉवर

डिजिटल डिस्प्ले: पार्किंग चालकांना बाहेर मोठे डिजिटल बोर्ड लावण्याचे निर्देश दिले असून त्यावर एकूण क्षमता आणि उपलब्ध मोकळ्या जागेची माहिती

गुगल मॅपवर उपलब्ध होणार ४३ वाहनतळे

नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतूक पोलिसांनी गुगलशी संपर्क साधून शहरातील ४३ अधिकृत 'पे अँड पार्क' ठिकाणे गुगल मॅपवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यात परळ, लोअर परळ, वरळी, दादर, शिवडी, भायखळा, वांद्रे, बीकेसी, घाटकोपर, अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली या प्रमुख भागांतील ३७ मोठ्या पार्किंगचा समावेश आहे. रिअल टाइम दिसेल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in