मुंबईतील गणेश मंडळांचा २ हजारांचा दंड होणार माफ

गणेशोत्सव काळात मंडपासाठी रस्त्यावर खड्डे करणाऱ्या गणेश मंडळांवर लावण्यात येणारा २ हजार रुपयांचा दंड माफ होणार आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केलेल्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे आश्वासन दिले.
मुंबईतील गणेश मंडळांचा २ हजारांचा दंड होणार माफ
Published on

मुंबई : गणेशोत्सव काळात मंडपासाठी रस्त्यावर खड्डे करणाऱ्या गणेश मंडळांवर लावण्यात येणारा २ हजार रुपयांचा दंड माफ होणार आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केलेल्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी गणेशोत्सव आढावा बैठक पार अजित पवार, पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृह राज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी महापालिकेने मंडपासाठी खड्डे केल्यास १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश दिले होते. समितीच्या विरोधानंतर दंड २ हजार रुपयांवर आणला गेला. मात्र, गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा असल्याने हा दंड पूर्णपणे माफ करावा, अशी मागणी समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी बैठकीत केली.

या बैठकीत 'पीओपी' मूर्तीवरील निर्बंधांबाबत कायमस्वरूपी दिलासा देण्याची, 'लालबागचा राजा' मंडपासमोर उभ्या राहणाऱ्या अग्निशमन बंबांच्या दिवसाला सव्वा लाख रुपयांचे शुल्क माफ करण्याची, तसेच गेल्या ३० वर्षांपासून चालत आलेली अनंत चतुर्दशीची सुट्टी पूर्ववत करण्याची मागणीही करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in