Mumbai : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा अहवाल सादर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांनी अहवाल सादर केला. मुख्यमंत्र्यांनी सीलबंद अहवाल स्विकारत गृह विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.
Mumbai : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा अहवाल सादर
Published on

मुंबई : घाटकोपर छेडा नगर येथील पेट्रोल पंपाजवळ महाकाय होर्डिंग कोसळले आणि १७ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळणे, होर्डिंगची साईज कमी करणे अशा प्रकारच्या सूचना माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांनी आपल्या अहवालात नमूद केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांनी अहवाल सादर केला. मुख्यमंत्र्यांनी सीलबंद अहवाल स्विकारत गृह विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला आहे.

१३ मे २०२४ रोजी मुंबईत जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. यात घाटकोपर पूर्व छेडा नगर येथील पेट्रोल पंपाजवळ महाकाय होर्डिंग कोसळले. या घटनेनंतर मुंबईतील धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आणि रेल्वे हद्दीतील धोकादायक होर्डिंग काढण्याचे फर्मान रेल्वे प्रशासनाने जारी केले. तर काही होर्डिंग पालिका प्रशासनाने काढले. मात्र या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय करता येईल यासाठी माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने मुंबईसह राज्यातील होर्डिंग अभ्यास करत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर केला.

समितीच्या सूचना

होर्डिंगच्या दुर्घटना टाळण्यासाठी होर्डिंगची साईज कमी करणे, होर्डिंग कुठे उभारण्यास परवानगी द्यावी, नियम काय असावेत, अशा विविध सूचना समितीने केल्या आहेत. माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांचा अहवाल महाराष्ट्र राज्य सरकारने स्विकारला असून त्याबाबत धोरण निश्चिती, अंमलबजावणी हे राज्य सरकार व संबंधित महानगर पालिका, नगर पालिका करतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in