Mumbai Hoarding Collapse: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला

Mumbai Storm News Highlights: सोमवारी मुंबईत आलेल्या धुळीचे वादळ आणि अवकाळी पावसाने घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर १०० फूट लांब बेकायदा होर्डिंग पडले होते.
Mumbai Hoarding Collapse: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला
Shashank Parade

Mumbai Hording Collapse Death Toll Rises: मुंबईमधील घाटकोपरच्या छेडा नगर येथे मंगळवारी (१३ मे रोजी) तब्बल १२० बाय १२० फुटांचे बेकायदा महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १४ झाली आहे. सध्या ४४ लोकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ३१ जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजावाडी हॉस्पिटलमध्ये सध्या ३८ (गंभीर १) जखमी उपचार घेत आहेत. या हॉस्पिटलमधील मृतांची संख्या ही १३ आहे. या हॉस्पिटल मधून २४ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. तर, सायन हॉस्पिटलमध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय, केईएम रुग्णालयात ५ आणि कळवा येथील प्रकृती हॉस्पिटलमध्ये १ जखमी उपचार घेत आहे.

मृतांना वारसांना पाच लाखांची मदत

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार

घाटकोपर छेडा नगर येथे महाकाय होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत तेथील स्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे यावेळी शिंदे म्हणाले.

मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्याने झालेली घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in