Mumbai : ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हलला परवानगी; गिरगाव चौपाटीवर होणार समारंभ

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आगामी १३ डिसेंबरला 'प्रभू येशू जन्मोत्सव ट्रस्ट'तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हलसाठी मुंबई उच्च न्यायालयाने १५ हजार चौरस मीटर जागेच्या वापराला परवानगी दिली आहे.
Mumbai : ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हलला परवानगी; गिरगाव चौपाटीवर होणार समारंभ
Mumbai : ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हलला परवानगी; गिरगाव चौपाटीवर होणार समारंभप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

एफपीजे न्यूज सर्व्हिस/मुंबई

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आगामी १३ डिसेंबरला 'प्रभू येशू जन्मोत्सव ट्रस्ट'तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हलसाठी मुंबई उच्च न्यायालयाने १५ हजार चौरस मीटर जागेच्या वापराला परवानगी दिली आहे. न्या. बी. पी. कोलबावाला आणि न्या. फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने ४ नोव्हेंबर रोजी हा अर्ज मंजूर केला असून एका दिवसाच्या या महोत्सवासाठी अतिरिक्त जागा मागणाऱ्या ट्रस्टला दिलासा दिला आहे.

यापूर्वी २०१८ च्या आदेशानुसार या महोत्सवासाठी केवळ ४,१८०.३ चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, ट्रस्टने १५ हजार चौरस मीटर जागेचा वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. याआधीच्या २०२३, २०२४ आणि २०२५ च्या सुमारास देखील याच परिसरामध्ये हा महोत्सव आयोजित करण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती, अशी नोंद न्यायालयाने केली तसेच या आधी किमान पाच वेळा ट्रस्टला अशा प्रकारच्या परवानग्या देण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. जागेची हद्द निश्चित करा !

मागील काही वर्षांत निर्धारित आयोजकांकडून क्षेत्रमर्यादेचे उल्लंघन केल्याच्या आणि अटींचा भंग झाल्याच्या तक्रारींवरही खंडपीठाने लक्ष वेधले. तसेच, काही वर्षांपूर्वी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेचा संदर्भही न्यायालयाने दिला. या पार्श्वभूमीवर, संबंधित प्राधिकाऱ्यांना तत्काळ जागेची हद्द निश्चित करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)