Mumbai : जीएमएलआरसाठी १,५२४ झाडांवर कुऱ्हाड; वृक्षतोडीचा प्रस्ताव तातडीने मागे घ्या, वॉचडॉग फाऊंडेशनची मागणी

विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल होत असून गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पात १,५२४ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे.
Mumbai : जीएमएलआरसाठी १,५२४ झाडांवर कुऱ्हाड; वृक्षतोडीचा प्रस्ताव तातडीने मागे घ्या, वॉचडॉग फाऊंडेशनची मागणी
Mumbai : जीएमएलआरसाठी १,५२४ झाडांवर कुऱ्हाड; वृक्षतोडीचा प्रस्ताव तातडीने मागे घ्या, वॉचडॉग फाऊंडेशनची मागणी
Published on: 

मुंबई : विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल होत असून गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पात १,५२४ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या निर्णयाला विरोध केला असून हा प्रस्ताव तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केल्याचे वॉचडॉग फाऊंडेशनचे ट्रस्टी अँड गॉडफ्री पिमेंटो यांनी सांगितले.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलांचे जाळे विस्तारले जात आहे. पूर्व व पश्चिमेला जोडण्यासाठी गोरेगाव- मुलुंड लिंक रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्पासाठी १,५२४ झाडांवर कुऱ्हाड चालविण्याच्या प्रस्तावावरून पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या वृक्षतोडीचा मुंबईच्या पर्यावरणावर, हवेच्या गुणवत्तेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा वॉचडॉग फाऊंडेशनने दिला आहे. प्रस्तावित वृक्षतोड मागे घेऊन पर्यायी मार्गांचा विचार करावा, अशी मागणी संस्थेने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

या प्रस्तावाबाबत गुरुवारी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वृक्षतोडीच्या सूचनेचा संदर्भ देत संस्थेने महापालिका आणि पर्यावरण विभागाला पत्र पाठविले आहे. प्रस्तावानुसार, गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या पश्चिम द्रुतगती महामार्ग ते ऐरोली टोलनाका या मार्गाच्या कामासाठी तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआर जंक्शनच्या सुधारणेसाठी ६९५ झाडे तोडण्यात येणार असून, ६६६ झाडांचे पुनर्रोपण करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, या वृक्षतोडीच्या या प्रस्तावावरुन नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत.

७ दिवसांत हरकती नोंदवा

जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांत नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयातील उद्यान विभागाकडे लेखी हरकती व सूचना नोंदवता येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in