Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरून विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका ; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत असून यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरून विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका ; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
Published on

गणेशोत्सवानिमित्त चाकरमाणी मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. गणपतीचा सण दोन दिवसांवर आल्याने चाकरमान्यांनी कोकणात धाव घेत आहेत. पण कोकणात जाण्यासाठी त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि राज्याच्या विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

कोकणात जाणाऱ्यां चाकरमान्यांना आज सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका बसला आहे. गणेशोत्सवापूर्वी गोवा हायवे वाहतूकीसाठी सुरळीत केला जाईल, अशी ग्वाही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली होती. यासाठी चार वेळा महामार्गाचा पाहणी दौरा करुन सुद्धा गणेशोत्सवासाठी महामार्ग नीट बनत नसेल तर त्या दौऱ्यांचा आणि आश्वासनांचा काय उपयोग? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाणार असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी आणण्यात आली होती. तरी देखील या महामार्गावरुन अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास येत आहे. महामार्गावर यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून १० मिनिटांच्या अंतरासाठी ४० ते ५० मिनिटं लागत आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचा हिरमोड झाला असल्याचं वियज वडेट्टीवार म्हणाले आहेत.

वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ३ ते ४ किलोमीटरपर्यंत या रांगा असल्याची माहिती देखील समोर आली आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमानी एसटी महामंडळाच्या बसेसचाही वापर करत आहेत. मात्र बसेसची संख्या कमी पडत असल्याची तक्रार आहे. बस मिळण्यासाठी प्रवशांना ४-५ तास अगोदर बसस्थानकात येऊन थांबावं लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in