मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस पेटली; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबई-गोवा महामार्गावर एका खासगी ट्रॅव्हल बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस पेटली; सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस पेटली; सुदैवाने जीवितहानी नाही
Published on

पेण : मुंबई-गोवा महामार्गावर एका खासगी ट्रॅव्हल बसने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पेण शहराजवळ पशुसंवर्धन कार्यालयाबाहेर मुंबई-गोवा महामार्गावर ओम साई ट्रॅव्हल्स या खासगी ट्रॅव्हल कंपनीची बस क्रमांक 'MH-03-EG-9277' ने शनिवारी पहाटे सुमारे ५:३० च्या दरम्यान अचानक पेट घेतला. आगीनंतर परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

सदरची बस चिपळूणव रून घाटकोपरला जात होती. बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. सदरच्या घटनेची माहिती कळताच पेण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. बस रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील ही भीषण दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

logo
marathi.freepressjournal.in