Mumbai : गोखले पुलावरून आजपासून बस धावणार; 'हे' बसमार्ग सुरू

अंधेरीतील गोखले पूल अडीच वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र त्यानंतरही या पूलावरून बेस्ट बससेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांकडून या पुलावरून बससेवा पूर्ववत करण्याची मागणी होत होती.
Mumbai : गोखले पुलावरून आजपासून बस धावणार; 'हे' बसमार्ग सुरू
Published on

मुंबई : अंधेरीतील गोखले पूल अडीच वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र त्यानंतरही या पूलावरून बेस्ट बससेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांकडून या पुलावरून बससेवा पूर्ववत करण्याची मागणी होत होती. अखेर शुक्रवार, २३ मेपासून बेस्टने, ए ३५९, ए ४२२ व ४२४ हे बसमार्ग पुन्हा गोखले पुलावरून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बस प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्यानंतर यावरील बस सेवा इतर मार्गाने वळवण्यात आली होती, तर काही बसमार्ग खंडित करण्यात आले होते. परिणामी दुसरा काहीच पर्याय नसल्याने तीन बसमार्ग पूर्णतः बंद करावे लागले होते. हा पूल बंद केल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. शिवाय यामुळे वाहतूककोंडीत भर पडली होती. त्यामुळे आता गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर बससेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती.

हे बसमार्ग सुरू

शुक्रवार, २३ मे पासून बेस्टने ए ४२२ - वांद्रे आगार ते विक्रोळी आगार, ए ३५९ - हिरानंदानी (पवई ) बस स्थानक ते मालवणी आगार व ४२४ -गोरेगाव आगार ते मुलुंड स्थानक (पश्चिम) असे तीन बस मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही बससेवा सुरू झाल्याने पूर्व - पश्चिम मार्गावर जाणाऱ्या व लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in