Mumbai : गोरेगावमध्ये उन्नत मार्ग; पालिका आयुक्तांकडून वीर सावरकर उड्डाणपुलासह विविध प्रकल्पस्थळांची पाहणी

मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सागरीकिनारा (उत्तर) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील विद्यमान वीर सावरकर उड्डाणपूल न पाडता त्याच्यावरून नवीन उन्नत पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उन्नत पुलामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक किनारा रस्त्याशी थेट जोडणे शक्य होणार आहे.
Mumbai : गोरेगावमध्ये उन्नत मार्ग; पालिका आयुक्तांकडून वीर सावरकर उड्डाणपुलासह विविध प्रकल्पस्थळांची पाहणी
Mumbai : गोरेगावमध्ये उन्नत मार्ग; पालिका आयुक्तांकडून वीर सावरकर उड्डाणपुलासह विविध प्रकल्पस्थळांची पाहणी
Published on: 

मुंबई : मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सागरीकिनारा (उत्तर) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील विद्यमान वीर सावरकर उड्डाणपूल न पाडता त्याच्यावरून नवीन उन्नत पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उन्नत पुलामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक किनारा रस्त्याशी थेट जोडणे शक्य होणार आहे.

मुंबई महानगरातील वाहतूककोंडी कमी करून प्रवास अधिक सुगम आणि अखंड करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या विविध कामांचा आयुक्त अश्विनी भिडे यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. प्रकल्पाच्या विविध टप्प्यांतील कामांचे सूक्ष्म नियोजन करावे, कामाची गती वाढवावी, सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखून कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रकल्पांचा आढावा

पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात दिंडोशी न्यायालय येथील गोरेगाव कनेक्टरच्या उन्नत मार्गाच्या कामापासून झाली. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाला मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कनेक्टरद्वारे जोडण्यात येणार आहे. त्यानंतर पॅकेज बी अंतर्गत गोरेगाव ते ओबेरॉय मॉलदरम्यान उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या उड्डाणपुलाच्या ३८ खांबांपैकी ११ खांबांचे बांधकाम पूर्ण झाले. जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. आयुक्त भिडे यांनी या कामांची सद्यस्थिती आणि पुढील नियोजनाची सविस्तर माहिती घेतली. यानंतर ओशिवरा- लोखंडवाला संकुल येथील मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कार्यालयात संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रकल्पाच्या विविध टप्प्यांतील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

काम ७ पॅकेजमध्ये होणार

मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा सुमारे ६० किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरबदल आणि जोडरस्त्यांसह वेसावे ते भाईंदर ही दोन नगरे किनारा रस्त्याने जोडणारा आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर-भाईंदर जोडरस्ता (डीबीएलआर) अशा एकूण सात पॅकेजमध्ये करण्यात येत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in