Mumbai : गोरेगावचे टोपीवाला मार्केट नोव्हेंबरमध्ये खुले करणार; लवकरच सुधार समितीत प्रस्ताव

गोरेगाव (पश्चिम) येथील टोपीवाला मार्केटच्या उद्घाटनाची प्रतीक्षा खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठ पुराव्यामुळे संपली असून ३० नोव्हेंबर २०२६ रोजी हे मार्केट जनतेसाठी खुले करण्याचा येणार असल्याचे आश्वासन मनपाच्या मार्केट विभागातील अधिकारी यांनी पालिकेच्या पी दक्षिण कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिले.
Mumbai : गोरेगावचे टोपीवाला मार्केट नोव्हेंबरमध्ये खुले करणार; लवकरच सुधार समितीत प्रस्ताव
Mumbai : गोरेगावचे टोपीवाला मार्केट नोव्हेंबरमध्ये खुले करणार; लवकरच सुधार समितीत प्रस्ताव
Published on: 

मुंबई : गोरेगाव (पश्चिम) येथील टोपीवाला मार्केटच्या उद्घाटनाची प्रतीक्षा खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठ पुराव्यामुळे संपली असून ३० नोव्हेंबर २०२६ रोजी हे मार्केट जनतेसाठी खुले करण्याचा येणार असल्याचे आश्वासन मनपाच्या मार्केट विभागातील अधिकारी यांनी पालिकेच्या पी दक्षिण कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिले.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पी दक्षिण मनपा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पी दक्षिण मनपा कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी, जोगेश्वरी, दिंडोशी पोलीस ठाण्याचे अधिकारी, इमारत व प्रस्ताव विभाग उपस्थित होते.

पी-दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा

गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगाव (पश्चिम) येथील मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला भाजी मार्केटच्या पुनर्विकासाचे काम सुरू होते. हे मार्केट जनहितार्थ सुरू करण्यात यावे, अशी जनतेची मागणी होती. त्यानुसार खासदार रवींद्र वायकर यांनी येथील कामाची मनपाच्या अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता. गुरुवारी पी-दक्षिण येथे पार पडलेल्या बैठकीत याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर टोपीवाला भाजी मार्केटचे काम ३० नोव्हेबर पूर्ण करून ते सुरू करण्याचा मानस असल्याचे आश्वासन मनपा अधिकारी यांनी दिले.

रुग्णालयाचा प्रस्ताव सुधार समितीत मांडणार

आरेतील युनिट क्रमांक ३० येथील रहिवाश्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नी सोडवण्यासाठी पालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशा सूचना खासदार यांनी मनपा अधिकारी याना दिल्या. आरेतील रहिवाशांना प्राथमिक आरोग्य सुविधा अधिका चांगल्या मिळाव्यात यासाठी आरेतील रुग्णालय मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी खासदार वायकर प्रयत्नशील होते. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सुधार समितीमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)