

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात असलेल्या सभागृहातील आसनव्यवस्था उत्कृष्ट असल्याचे समोर आले आहे. सभागृहातील आसनव्यवस्थेबाबत गेल्या तीन वर्षांत नागरिक अथवा सदस्यांकडून एकही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत सभागृहातील आसनव्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे आसनव्यवस्था कमतरतेबाबत नगरसेवकांच्या तक्रारी शासन दरबारी नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली सभागृहातील आसनव्यवस्थेबाबत विविध मुद्द्यांवर माहिती मागविली होती. त्याला कार्यकारी अभियंता कार्यालयाने माहिती दिली आहे.
एकूण २३७ आसन व्यवस्था
मुंबई पालिकेच्या सभागृहात सध्या एकूण २३७ आसने उपलब्ध असून त्यापैकी २२७ आसने नगरसेवकांसाठी, तर १० आसने स्वीकृत नगरसेवकांसाठी राखीव आहेत. सभागृहाची विद्यमान आसनरचना अनेक अनक वर्षापासून वर्षांपासून कायम असून, मागील पाच वर्षांत त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.