मुंबई आशियातील सर्वात 'आनंदी' शहर; बीजिंग आणि शांघायला मागे टाकत मारली बाजी

आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते, याबाबत नागरिकांकडून त्यांची मते जाणून घेण्यात आली. प्रत्येक शहराची संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती, नाइटलाइफ, एकूण जीवनमान या सर्व मुद्द्यांवरून ‘टाइम आऊट २०२५’ने आशियातील सर्वात आनंदी शहरांची यादी तयार केली. त्यात मुंबईने अव्वल स्थान प्राप्त केले.
मुंबई आशियातील सर्वात 'आनंदी' शहर; बीजिंग आणि शांघायला मागे टाकत मारली बाजी
मुंबई आशियातील सर्वात 'आनंदी' शहर; बीजिंग आणि शांघायला मागे टाकत मारली बाजी
Published on

दुबई : ‘सुख म्हणजे नक्की काय असते’, असे कुणाला विचारले तर त्याचे उत्तर कुणालाही देता येणार नाही. प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक घडामोडीतून सुख मिळवता येऊ शकते. एखाद्या सुंदर ठिकाणी भेट देणे, एखाद्या कॅफेमध्ये जाऊन मस्त कॉफीची मजा लुटणे, यातही आनंद मिळवता येऊ शकतो. याच आनंदी शहरांच्या यादीत मुंबईने आशिया खंडात अग्रस्थान प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, मुंबईने चीनमधील बीजिंग आणि शांघाय या शहरांना मागे टाकत बाजी मारली आहे.

आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते, याबाबत नागरिकांकडून त्यांची मते जाणून घेण्यात आली. प्रत्येक शहराची संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती, नाइटलाइफ, एकूण जीवनमान या सर्व मुद्द्यांवरून ‘टाइम आऊट २०२५’ने आशियातील सर्वात आनंदी शहरांची यादी तयार केली. त्यात मुंबईने अव्वल स्थान प्राप्त केले. विशेष म्हणजे, जगातील सर्वात आनंदी शहरांमध्येही मुंबईने पाचवे स्थान पटकावले आहे. या यादीत संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईचे अबूधाबी हे शहर अग्रस्थानी आहे. आशियातील सर्वात सुंदर शहरांच्या यादीत मुंबईनंतर बीजिंग आणि शांघाय हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. थायलंडमधील चियांग माय हे चौथ्या आणि व्हिएतनाममधील हनोई पाचव्या क्रमांकावर आहे. इंडोनेशियाच्या जाकार्ताने सहावा तर हाँगकाँगने सातवा क्रमांक पटकावला आहे. बँकाक, सिंगापूर आणि स्योल ही शहरे अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.

‘टाइम आऊट २०२५’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ९४ टक्के स्थानिक रहिवाशांनी मुंबई आम्हाला सर्वात जास्त आनंद देत असल्याचे नोंदवले. जगातील इतर कोणत्याही शहरापेक्षा मुंबईत आम्हाला सर्वात जास्त आनंद मिळतो, असे ८९ टक्के लोकांनी सांगितले. ८८ टक्के लोकांनी मुंबई अधिक सकारात्मक असल्याचे तर ८७ टक्के नागरिकांनी मुंबईच्या आनंदात आणखीन भर पडल्याचे मत नोंदवले.

जगातील सर्वात १० आनंदी शहरे

१) अबूधाबी (यूएई), २) मेडेलिन (कोलंबिया), ३) केपटाऊन (दक्षिण आफ्रिका), ४) मेक्सिको सिटी (मेक्सिको), ५) मुंबई (भारत), ६) बीजिंग (चीन), ७) शांघाय (चीन), ८) शिकागो (अमेरिका), ९) सेव्हिल (स्पेन), १०) मेलबर्न (ऑस्ट्रेलिया).

आशियातील सर्वात १० आनंदी शहरे

१) मुंबई (भारत), २) बीजिंग (चीन), ३) शांघाय (चीन), ४) चियांग माय (थायलंड), ५) हनोई (व्हिएतनाम), ६) जकार्ता (इंडोनेशिया), ७) हाँगकाँग, ८) बँकॉक (थायलंड), ९) सिंगापूर, १०) सेऊल (दक्षिण कोरिया).

logo
marathi.freepressjournal.in