Mumbai : हार्बर मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांची पसंती; प्रवासी संख्या ६५ टक्क्यांनी वाढली

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वातानुकूलित (एसी) उपनगरी सेवांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
Mumbai : हार्बर मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांची पसंती; प्रवासी संख्या ६५ टक्क्यांनी वाढली
Mumbai : हार्बर मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांची पसंती; प्रवासी संख्या ६५ टक्क्यांनी वाढली(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वातानुकूलित (एसी) उपनगरी सेवांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पंधरवड्यात प्रवासी संख्येत तब्बल ६५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. यामुळे प्रवासी संख्येबरोबरच महसुलातही मोठी वाढ झाली आहे.

हार्बर मार्गावर एसी उपनगरी सेवा २६ जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आली. सुरुवातीपासूनच या सेवांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने मध्य रेल्वेने १ मे २०२६ पासून आणखी १४ अतिरिक्त एसी फेऱ्या सुरू केल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या एसी उपनगरी सेवांची एकूण संख्या १०८ वर पोहोचली असून त्यामध्ये मुख्य मार्गावरील ८० आणि हार्बर मार्गावरील २८ सेवांचा समावेश आहे.

Mumbai : हार्बर मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांची पसंती; प्रवासी संख्या ६५ टक्क्यांनी वाढली
हार्बरवरील एसी लोकलमुळे प्रवाशांचा खोळंबा; सामान्य लोकल १५ मिनिटे उशिराने, स्थानकांमध्ये गर्दी वाढली, प्रवाशांची स्वाक्षरी मोहीम

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल ते ३० एप्रिल आणि १ मे ते १५ मे या दोन पंधरवड्यांत हार्बर मार्गावरील एसी लोकलमधील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

महसुलात ६६ टक्क्यांनी वाढ

प्रवासी संख्येबरोबरच महसुलातही मोठी वाढ झाली आहे. हार्बर मार्गावरील एसी सेवांमधून मिळणारा महसूल १.१८ कोटी रुपयांवरून १.९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, त्यामध्ये ६६.४३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच विनातिकिटाविना प्रवास रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून एसी लोकल आणि स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहिमा सातत्याने राबविण्यात येत आहेत. या मोहिमांद्वारे विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in