Mumbai : हार्बर मार्गावर लोकलचा खोळंबा; ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकला

शिवडी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकल्याने शनिवारी सकाळी हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेमुळे पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.
Mumbai : हार्बर मार्गावर लोकलचा खोळंबा; ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकला
Mumbai : हार्बर मार्गावर लोकलचा खोळंबा; ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकला
Published on: 

मुंबई : शिवडी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकल्याने शनिवारी सकाळी हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेमुळे पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.

शिवडी स्थानकातील फलाट क्रमांक दोनजवळ सकाळी ९.४४ वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये कपडा अडकल्याचे आढळले. यामुळे विद्युत यंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने अप मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली.

कोंडीचा परिणाम वेळापत्रकावर

घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कपडा हटवण्याचे काम हाती घेतले. सकाळी १०.१३ वाजता ओव्हरहेड वायरवरील कपडा हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे सुमारे २९ मिनिटांनंतर लोकल सेवा पुन्हा सुरू झाली. मात्र, या कालावधीत विविध स्थानकांवर थांबलेल्या लोकल आणि निर्माण झालेल्या वाहतूककोंडीचा परिणाम पुढील गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला. त्यामुळे सेवा पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)