ठाकरे गटाला न्यायालयाचा दणका; मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या २२७ राहणार

शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने केली होती याचिका, नेमकं प्रकरण काय?
ठाकरे गटाला न्यायालयाचा दणका; मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या २२७ राहणार
Published on

शिंदे फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर मुंबई उच्चं न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारने काढलेला अध्यादेश कायम ठेवावा, असे निर्देश दिले आहेत. यामुळे ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना मुख्यमंत्री पदावर उद्धव ठरले होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या ही २३६ केली होती. यानंतर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने हा अध्यादेश रद्द करत कायद्यात फेरदुरुस्ती करून प्रभागांची संख्या पूर्ववत म्हणजेच २२७ केली होती. याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याचिका दाखल केली होती. यानंतर आज मुंबई उच्चं न्यायालयाने यासंदर्भात शिंदे - फडणवीस सरकारच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता आगामी निवडणुकीमध्ये प्रभागांची संख्या ही २२७ असेल.

logo
marathi.freepressjournal.in