
मुंबई : आर्थिक फसवणूक प्रकरणी अडचणीत आलेल्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. राज्य सरकारचा याचिकेला असलेला विरोध पाहता मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने कौटुंबिक सहलीनिमित्त २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान फुकेतला जाण्याची विनंती फेटाळली.
आर्थिक फसवणूक प्रकरणी अडचणीत आलेल्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी विरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे त्यांना देश सोडून कुठेही जाण्यास निर्बंध आहेत. २ ते ५ ऑक्टोबर दरम्यान कौटुंबिक सहलीनिमित्त फुकेतला जाण्याची परवानगी मिळावी यासाठी दोघांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.
याचिकाकर्त्यांच्यावतीने हा गुन्हा काही वर्षांपूर्वीचा असून राज कुंद्रा हे एक हॉटेल व्यावसायिक असून ते समन्सनुसार चौकशीलाही सामोरे गेले आहेत, असे सांगण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील मनकूंवर देशमुख यांनी याचिकेला जोरदार आक्षेप घेतला.