Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस

चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठाच्या ‘मॅडम कामा गर्ल्स हॉस्टेल’मधील तीव्र पाणीटंचाईची उच्च न्यायालयाने सोमवारी स्वत:हून गंभीर दखल घेतली. मागील १५ दिवसांहून अधिक काळ विद्यार्थिनींचे पाण्याविना हाल होत आहेत. हा अत्यंत गंभीर विषय आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले...
Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस
Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस
Published on

मुंबई : चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठाच्या ‘मॅडम कामा गर्ल्स हॉस्टेल’मधील तीव्र पाणीटंचाईची उच्च न्यायालयाने सोमवारी स्वत:हून गंभीर दखल घेतली. मागील १५ दिवसांहून अधिक काळ विद्यार्थिनींचे पाण्याविना हाल होत आहेत. हा अत्यंत गंभीर विषय आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि महापालिका प्रशासन व विद्यापीठाला नोटीस बजावली. याप्रकरणी दोन आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे.

हॉस्टेलमधील पाणीटंचाईसंबंधित मराठी वृत्तपत्रांमधील बातम्यांची दखल घेत उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम आंखड यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्यावर खंडपीठाने हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे मत नोंदवले. तसेच या प्रकरणात न्यायालयाला कायदेशीर मदत करण्यासाठी ‘अमिकस क्युरी’ म्हणून ॲड. सुश्री खानविलकर यांची नियुक्ती केली.

मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून पाण्याचा थेंबही नीट येत नसल्याचे समोर आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in