Mumbai : वकिलाविरुद्ध गुन्ह्याची नोंद; पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुंबई विमानतळावर खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी वकिलाविरुद्ध दाखल केलेला खटला बंद न केल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले. हे काय चाललेय? तुम्ही नेमकी कुठे वाटचाल करताय? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने पोलिसांचे कान उपटले.
Mumbai : वकिलाविरुद्ध गुन्ह्याची नोंद; पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
Published on

मुंबई : मुंबई विमानतळावर खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी वकिलाविरुद्ध दाखल केलेला खटला बंद न केल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले. हे काय चाललेय? तुम्ही नेमकी कुठे वाटचाल करताय? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने पोलिसांचे कान उपटले. याचवेळी याचिकाकर्त्या वकिलाविरोधातील सर्व फाैजदारी कारवाईला न्यायालयाने लगाम लावला.

मुंबई विमानतळावर खाजगी कंपनीत ट्राॅली सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने २०२० मधे आत्महत्या केली. त्यावेळी त्याने एक सुसाईड नोट लिहिली होती. त्या अनुषंगाने साकीनाका पोलिसांनी कंपनीचा मालक आणि त्याच्या वकिलाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या जाचक कारवाईवर आक्षेप घेत वकिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.त्या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

logo
marathi.freepressjournal.in