Mumbai : आजपासून समुद्राला मोठी भरती; ४ दिवस समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहा : BMC चे आवाहन; ४ महिन्यात १९ वेळा येणार भरती

मुंबईत २८ जूनपर्यंत सलग समुद्राला मोठी भरती येणार असून यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान १९ वेळा समुद्राला मोठी भरती असणार असल्याचे सांगण्यात आले.
Mumbai : आजपासून समुद्राला मोठी भरती; ४ दिवस समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहा : BMC चे आवाहन; ४ महिन्यात १९ वेळा येणार भरती
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईत २८ जूनपर्यंत सलग समुद्राला मोठी भरती येणार असल्याचे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातर्फे जाहीर करण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान १९ वेळा समुद्राला मोठी भरती असणार असल्याचे सांगण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यातील भरतीचा तपशील मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला. त्यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा २६ जून २०२५ रोजी उसळणार आहेत.

चार दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रकिनाऱ्या नजीक जावू नये, तसेच पालिकेच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. शहरातील समुद्रकाठच्या रहिवाशांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

अशी आहे मोठी भरती :

-जून २०२५

बुधवार, दि. २५ दुपारी - १२.०५ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.७१

गुरुवार, दि. २६ दुपारी - १२.५५ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.७५

शुक्रवार, दि. २७ दुपारी - १.४० वा. लाटांची उंची (मीटर) - ४.७३

शनिवार, दि. २८ दुपारी - २.२६ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६४

-जुलै २०२५

गुरुवार, दि.२४ सकाळी-११.५७ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५७

शुक्रवार, दि.२५ दुपारी-१२.४० वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६६

शनिवार, दि.२६ दुपारी-१.२० वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६७

रविवार, दि. २७ दुपारी-१.५६ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.६०

-ऑगस्ट २०२५

रविवार, दि. १० दुपारी - १२.४७ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५०

सोमवार, दि. ११ दुपारी - १.१९ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५८

मंगळवार, दि. १२ दुपारी - १.५२ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५८

शनिवार, दि. २३ दुपारी - १२.१६ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५४

रविवार, दि. २४ दुपारी - १२.४८ वा. लाटांची उंची (मीटर) - ४.५३

logo
marathi.freepressjournal.in