झोपडपट्टीसह मुंबई स्वच्छ व कचरामुक्त ;ड्रेनेज, पेस्ट कंट्रोल, दुभाजक स्वच्छतेवर भर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सफाई कामगारांच्या वसाहतींमध्ये सरप्राइज व्हिजीट केली असता त्याठिकाणी अस्वच्छता निदर्शनास आली.
झोपडपट्टीसह मुंबई स्वच्छ व कचरामुक्त
;ड्रेनेज, पेस्ट कंट्रोल, दुभाजक स्वच्छतेवर भर

मुंबई : पालिकेच्या २४ वॉर्डापैकी एक वॉर्ड दर शनिवारी स्वच्छ करण्याचे अभियान राबवण्यात येत आहे. या स्वच्छता मोहीमेत कचरा मुक्त मुंबई करणे असले, तरी त्या त्या वॉर्डातील ड्रेनेज साफ करणे, पेस्ट कंट्रोल करणे, दुभाजक स्वच्छ करणे आदी कामे करण्यात येत आहेत. स्वच्छ व सुंदर मुंबई अभियाना अंतर्गत झोपडपट्टीतील स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सफाई कामगारांच्या वसाहतींमध्ये सरप्राइज व्हिजीट केली असता त्याठिकाणी अस्वच्छता निदर्शनास आली. माझगाव, वांद्रे परिसरातून जात असताना रस्त्यावर कचऱ्याचे ढीग एकनाथ शिंदे यांच्या निर्दशनास आले. त्यानंतर स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी दररोज स्वच्छता अभियान राबवण्याचे आदेश शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रविवार ३ डिसेंबर रोजी धारावीतून स्वच्छता अभियानाचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर शनिवार ९ नोव्हेंबर रोजी पालिकेच्या सी विभागात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. परंतु स्वच्छता अभियाना अंतर्गत रस्त्यावरील कचरा उचलणे नसून त्या त्या वॉर्डातील ड्रेनेज लेन साफ करणे, पेस्ट कंट्रोल करणे दुभाजक स्वच्छ करणे, पर्जन्य जल वाहिन्यांची सफाई करणे, रस्ते - दुभाजक रंगवणे आदी कामे त्या त्या वॉर्डात करण्यात येणार आहेत.

चार वॉर्डातील मनुष्यबळ एका वॉर्डात

दर शनिवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेच्या परिमंडळातील एका वॉर्डातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. ज्या परिमंडळातील एका वॉर्डात शनिवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल, त्या परिमंडळातील अन्य वॉर्डातील मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. यामुळे त्या वॉर्डातील स्वच्छता योग्य पद्धतीने होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in