मुंबई महिलांसाठी असुरक्षित! ८ वर्षाच्या चिमुकलीवर ५३ वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार

मुलीची आई कामावर जात असताना मुलीची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नसल्यामुळे तिला आरोपीच्या घरी सोडून जात होती
मुंबई महिलांसाठी असुरक्षित! ८ वर्षाच्या चिमुकलीवर ५३ वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार

मुंबईतून एक हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरी भागात एका ८ वर्षांच्या मुलीवर ५३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. आरोपी आणि पीडित तरुणी एकाच इमारतीत राहत असून मुलीची आई कामावर जात असताना मुलीची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नसल्यामुळे तिला आरोपीच्या घरी सोडून जात होती. काही दिवसांपूर्वी मुलीने आपल्या आईला आपल्या होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितलं. यानंतर आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आयपीसी कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंड येथील झोपडपट्टीत एका १६ वर्षीय तरुणीवर तिच्याच घरात चाकूचा धाक दाखवून बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना आता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी २१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे, तर त्याचा एक साथीदार फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपीला ओळखत असून दोघेही एकाच परिसरात राहतात. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने त्याच्या मित्रासह पीडितेच्या घरात प्रवेश केला जेव्हा ती घरात एकटी होती.

आरोपीने मुलीवर चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा कुटुंबीय घरी परतले तेव्हा मुलीने त्यांना सर्व आपबिती सांगितली. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने मुलुंड येथून काही तासांतच एका आरोपीला अटक करण्यात आली. तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in