Mumbai : आधी खाल्ली बिर्याणी, मग कलिंगड... एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू; अन्नातून विषबाधेचा संशय

दक्षिण मुंबईतील जे.जे. मार्ग परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Mumbai : आधी खाल्ली बिर्याणी, मग कलिंगड; एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू, अन्नातून विषबाधेचा संशय
Mumbai : आधी खाल्ली बिर्याणी, मग कलिंगड; एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू, अन्नातून विषबाधेचा संशय
Published on

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे.जे. मार्ग परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या कुटुंबाने रात्रीच्या जेवणात बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर काही वेळातच कलिंगडाचे सेवन केले होते, जे त्यांच्या जीवावर बेतल्याचे सांगितले जात आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या जबानीनुसार, बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्वांना उलट्या आणि मळमळीचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती वेगाने खालावल्याने या चारही सदस्यांचा मृत्यू झाला. ही विषबाधा बिर्याणी आणि कलिंगड यांच्या विसंगत मिश्रणामुळे झाली की त्यातील एखादा खाद्यपदार्थ आधीच दूषित किंवा खराब झाला होता, याचा सखोल तपास आता मुंबई पोलिसांकडून केला जात आहे.

चौघांना उलट्या - जुलाबाचा तीव्र त्रास

अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांची पत्नी नसरीन डोकाडिया (३५), मोठी मुलगी आयशा डोकाडिया (१६) आणि छोटी मुलगी ज़ैनब डोकाडिया (१३) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री १०.३० च्या सुमारास या कुटुंबाने आपल्या इतर पाच नातेवाईकांसह रात्रीचे जेवण केले. जेवणानंतर नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर चौघांनी कलिंगड खाल्ले. मात्र, दुसऱ्या दिवशी रविवारी २६ एप्रिल रोजी पहाटे ५.३० ते ६ च्या सुमारास चौघांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला.

प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने फॅमिली डॉक्टरांकडून उपचार घेतले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना तत्काळ जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारांदरम्यान सकाळी १०.१५ वाजता जैनब हिचा मृत्यू झाला. त्यानंतर नसरीन आणि आयशाचा मृत्यू झाला. रात्री १०.३० वाजता अब्दुल्ला यांचाही मृत्यू झाल

हिस्टो-पॅथॉलॉजी अहवालाकडे पोलीसांचे लक्ष

या घटनेची गांभीर्याने दखल घेत जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून हिस्टो-पॅथॉलॉजी अहवाल प्राप्त होईपर्यंत डॉक्टरांनी अंतिम मत राखून ठेवले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली. रात्रीच्या जेवणामुळे विषबाधा झाली की त्यानंतर खाल्लेल्या कलिंगडामुळे हा प्रकार घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in