Mumbai : कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती; प्रकल्प कार्यालय, संमती नोंदणी केंद्र आणि नमुना सदनिकेचे उद्घाटन

कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळाली असून, प्रकल्पाच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. प्रकल्पस्थळी कार्यालय आणि संमती नोंदणी केंद्राचे उद्घाटन खासदार मिलिंद देवरा, अरविंद सावंत, आमदार अमीन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
Mumbai : कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती; प्रकल्प कार्यालय, संमती नोंदणी केंद्र आणि नमुना सदनिकेचे उद्घाटन
Mumbai : कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाला गती; प्रकल्प कार्यालय, संमती नोंदणी केंद्र आणि नमुना सदनिकेचे उद्घाटनप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळाली असून, प्रकल्पाच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. प्रकल्पस्थळी कार्यालय आणि संमती नोंदणी केंद्राचे उद्घाटन खासदार मिलिंद देवरा, अरविंद सावंत, आमदार अमीन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर प्रकल्पातील रहिवासी, भाडेकरू आणि लाभार्थ्यांना भविष्यात उपलब्ध होणाऱ्या सदनिकांचे स्वरूप प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी उभारण्यात आलेल्या नमुना सदनिकेचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधांमुळे प्रकल्पाशी संबंधित नागरिकांना नोंदणी, माहिती आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. कामाठीपुरा गल्ली क्र. १ येथे हे कार्यालय थाटण्यात आले आहे.

म्हाडा आहे नोडल एजन्सी, विशेष नियोजन प्राधिकरण

पुनर्विकासाच्या माध्यमातून विद्यमान रहिवासी व भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्याबरोबरच सुमारे ४,५०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी तसेच विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दर्जा देण्यात आला आहे. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष विकासाची अंमलबजावणी कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सीमार्फत करण्यात येणार आहे.

५०० चौ.फुटांची घरे

यावेळी खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, दक्षिण मुंबईतील प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८००० भाडेकरू, रहिवासी यांचे ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकेत विनामूल्य पुनर्वसन होणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)