Mumbai : कामाठीपुरा येथील आगीत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

कामाठीपुरा येथील ९ व्या गल्लीमध्ये शंकर मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीच्या घटनेत धुरामुळे गुदमरल्याने एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Mumbai : कामाठीपुरा येथील आगीत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Mumbai : कामाठीपुरा येथील आगीत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Published on

मुंबई : कामाठीपुरा येथील ९ व्या गल्लीमध्ये शंकर मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी ३.४० वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीच्या घटनेत धुरामुळे गुदमरल्याने एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. कामाठीपुरा येथे ९ व्या गल्लीत शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली.

या दुर्घटनेत विद्युत वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, एअर कंडिशनिंग युनिट, पंखे, कपडे तसेच घरगुती साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रणमिळवले. दरम्यान, आगीच्या धुरामुळे बेशुद्ध झालेल्या एका व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

दरम्यान, आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास अग्निशमन दलाचे अधिकारी व पोलीस करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in