भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करा! न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

कांदिवली पूर्व येथील तीन गृहनिर्माण सोसायट्यांनी दोन भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवापासून रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तीन सोसायट्यांतील जवळपास २ हजार रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे.
भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करा! न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश
भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करा! न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश
Published on: 

मुंबई : कांदिवली पूर्व येथील तीन गृहनिर्माण सोसायट्यांनी दोन भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवापासून रहिवाशांचे रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. तीन सोसायट्यांतील जवळपास २ हजार रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. वारंवार चावण्याच्या घटनांनंतर रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने बृहन्मुंबई महापालिकेला कुत्रे चावण्याच्या घटना रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाय करण्याचे व १ डिसेंबरपर्यंत कळवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

गृहनिर्माण सोसायट्यांच्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने प्राथमिक सुनावणी घेऊन सविस्तर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.

चावण्याच्या ६० घटना

शिवालिक टॉवर्स, शिवालय रेसिडेन्सी आणि गायत्री शिवम् या तीन सोसायट्यांनी याचिका दाखल केली आहे. तीनही सोसायट्यांचा एकत्रित क्लस्टर असून तिथे सुमारे २ हजार रहिवासी राहतात. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, काळा कुत्रा आणि पांढरा कुत्रा हे दोघेही आक्रमक झाले आहेत. त्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यात महिला, मुले, ज्येष्ठांचा समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)