अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर शेजाऱ्याकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; आरोपी फरार

शेजारी राहणाऱ्या एका २४ वर्षांच्या तरुणाने एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना कांदिवली परिसरात
अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर शेजाऱ्याकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; आरोपी फरार

मुंबई : शेजारी राहणाऱ्या एका २४ वर्षांच्या तरुणाने एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध समतानगर पोलिसांनी भादंविसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू केला आहे.

आरोपी आणि पीडित मुलगा एकाच परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहे. पीडित मुलगा याच परिसरातील एका शाळेत आठवीत शिकतो. त्याचे आई-वडील काम करत असल्याने ते अनेकदा बाहेर कामानिमित्त राहत होते. ही संधी साधून त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने त्याला अश्लील व्हिडीओ दाखवून त्याच्याशी अश्लील चाळे केले होते. कोणालाही हा प्रकार सांगितला तर त्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत होता. त्याच्याकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून त्याने रविवारी हा प्रकार त्याच्या पालकांना सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर समतानगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in