Mumbai : जन्मतः अवघ्या ७०० ग्रॅम वजनी बालकाला संजीवनी; KEM रुग्णालयात यशस्वी उपचारांनंतर डिस्चार्ज

मुदतपूर्व जन्मलेल्या आणि जन्मतः अवघे ७०० ग्रॅम वजन असलेल्या बालकाला मुंबई पालिकेच्या केईएम रुग्णालयात वैद्यकीय चमूने संजीवनी दिली आहे. नवजात शिशू अतिदक्षता विभागात विभागात या बालकावर पाच महिने विशेष उपचार केल्यानंतर बालकाचे वजन ३.३ किलोग्रॅम झाले.
Mumbai : जन्मतः अवघ्या ७०० ग्रॅम वजनी बालकाला संजीवनी; KEM रुग्णालयात यशस्वी उपचारांनंतर डिस्चार्ज
Mumbai : जन्मतः अवघ्या ७०० ग्रॅम वजनी बालकाला संजीवनी; KEM रुग्णालयात यशस्वी उपचारांनंतर डिस्चार्ज
Published on: 

मुंबई : मुदतपूर्व जन्मलेल्या आणि जन्मतः अवघे ७०० ग्रॅम वजन असलेल्या बालकाला मुंबई पालिकेच्या केईएम रुग्णालयात वैद्यकीय चमूने संजीवनी दिली आहे. नवजात शिशू अतिदक्षता विभागात विभागात या बालकावर पाच महिने विशेष उपचार केल्यानंतर बालकाचे वजन ३.३ किलोग्रॅम झाले. आता बाळाची वाढ पूर्णपणे मातेच्या स्तनपानावर होत असून बालकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

केईएम रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता हरिबालकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय चमूने या बालकावर प्रदीर्घ आणि अत्यंत आव्हानात्मक उपचार केले. उपचारादरम्यान अर्भकाला अतिदक्षता सेवेखाली ठेवण्यात आले होते. तसेच, श्वसनासाठी विशेष वैद्यकीय सहाय्य करण्यात आले.

या उपचारादरम्यान अर्भकाला अनेक गुंतागुंतीच्या परिस्थितींना सामोरे जावे लागले. मात्र, सातत्यपूर्ण वैद्यकीय निरीक्षण व तज्ज्ञांच्या समन्वयातून करण्यात आलेले उपचार तसेच डॉक्टर आणि परिचारिका यांनी सर्व अडचणींवर टप्प्याटप्प्याने मात करुन अर्भकाची प्रकृती उत्तम व्हावी यादृष्टीने प्रयत्न केले.

संवेदनशील सेवा पुरवणारे रुग्णालय

वैद्यकीय तज्ज्ञांची कुशलता, अत्याधुनिक सुविधा, विविध विभागांतील समन्वय आणि सातत्यपूर्ण रुग्णसेवा यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अत्यंत नाजूक प्रकृतीच्या नवजात बालकांवरही प्रभावीपणे उपचार करण्यात नवजात शिशू विभागाला यश मिळत आहे. या घटनेमुळे प्रगत आणि संवेदनशील आरोग्यसेवा पुरवणाऱ्या सार्वजनिक वैद्यकीय रुग्णालयाची महत्त्वपूर्ण भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे तसेच विशेष नवजात शिशू उपचार सेवांचा दर्जाही अधोरेखित झाला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)