Mumbai : लैंगिक छळप्रकरणी KEM च्या डॉक्टरला जामीन नाकारला; पीडितांच्या मानसिक आघाताचा विचार करणे आवश्यक - HC

केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टराला सहा महिला कनिष्ठ डॉक्टरांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.
Mumbai : लैंगिक छळप्रकरणी KEM च्या डॉक्टरला जामीन नाकारला; पीडितांच्या मानसिक आघाताचा विचार करणे आवश्यक - HC
Published on

मुंबई : केईएम रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टराला सहा महिला कनिष्ठ डॉक्टरांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. पीडित महिलांना झालेला मानसिक व भावनिक त्रास विचारात घेणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने यावेळी म्हटले.

केईएम रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागातील अतिरिक्त प्राध्यापक रवींद्र देवकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. या पीडित महिला केईएममध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी देवकर यांच्यावर गैरवर्तन, अनुचित स्पर्श आणि अश्लील टिप्पणी केल्याचे आरोप केले आहेत.

न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने म्हटले की, देवकर यांनी आपल्या वरिष्ठ पदाचा गैरफायदा घेत अनेक वर्षांपासून हे वर्तन सुरू ठेवले होते. आजवर कोणीही तक्रार करण्यास तयार नव्हते कारण त्यांना मानसिक धक्का बसला होता व करिअरवर परिणाम होण्याची भीती होती.”

logo
marathi.freepressjournal.in