Mumbai : स्तन कर्करोगाचे निदान वेगाने होणार; KEMमध्ये ‘थ्रीडी मॅमोग्राफी’ मशीन सुरू

मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात अत्याधुनिक थ्रीडी डिजिटल टोमोसिंथेसिस मॅमोग्राफी मशीन उपलब्ध झाली आहे.
Mumbai : स्तन कर्करोगाचे निदान वेगाने होणार; KEMमध्ये ‘थ्रीडी मॅमोग्राफी’ मशीन सुरू
Mumbai : स्तन कर्करोगाचे निदान वेगाने होणार; KEMमध्ये ‘थ्रीडी मॅमोग्राफी’ मशीन सुरू
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात अत्याधुनिक थ्रीडी डिजिटल टोमोसिंथेसिस मॅमोग्राफी मशीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्तन कर्करोगाचे वेळीच प्राथमिक निदान व उपचार करणे शक्य झाले आहे.

आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या देणगीतून केईएम रुग्णालयात ही मशीन उपलब्ध झाल्याचे केईएमच्या अधिष्ठाता डॉ संगीता रावत यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे मशीन टाटा रुग्णालयाव्यतिरिक्त कुठेही उपलब्ध नसल्याचे डॉ. रावत यांनी सांगितले.

Mumbai : स्तन कर्करोगाचे निदान वेगाने होणार; KEMमध्ये ‘थ्रीडी मॅमोग्राफी’ मशीन सुरू
‘टाइप-१’ मधुमेहावर प्रभावी ठरणार ‘जीन थेरपी’; एका इंजेक्शनने आजार बरा होण्याचा अंदाज

गेल्या काही वर्षांत स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान व उपचार करणे गरजेचे आहे. स्तन कर्करोगाच्या अत्यंत प्राथमिक स्थितीत हे निदान शक्य असल्यामुळे वेळीच उपचार करणे शक्य झाले आहे. पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास कर्करोगावर पूर्णपणे मात करणे शक्य होणार आहे. हे सर्व रुग्णांसाठी एक वरदानच ठरणार आहे, असा विश्वास डॉ रावत यांनी व्यक्त केला. क्ष-किरण विभाग प्रमुख, डॉ. हेमांगिनी ठक्कर यांच्या मते, ४० वर्षानंतर प्रत्येक स्त्रीने वर्षातून एकदा तरी तपासणी करून घेणे जरुरीचे आहे. ज्यांच्या घरात स्तन कर्करोगाचा इतिहास आहे. त्यासाठी वयाच्या ३५ वर्षांनंतर दरवर्षी न चुकता ही तपासणी करणे जरुरी आहे. यासाठी मार्गदर्शन आणि मोलाचा पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता, डॉ. संगिता रावत यांचे मनोपूर्वक धन्यवाद मानले.

Mumbai : स्तन कर्करोगाचे निदान वेगाने होणार; KEMमध्ये ‘थ्रीडी मॅमोग्राफी’ मशीन सुरू
उपचार नको, पण खर्च आवर! मुंबईत वैद्यकीय खर्च दुप्पट; रुग्ण आर्थिक संकटात

५ मिनिटांत स्तन चिकित्सा

स्तन चिकित्सा ५ मिनिटांत करता येते. यामुळे किरणसंसर्ग हे ही ३० टक्के एवढे कमी असून रुग्णाला निदानाच्या दरम्यान त्रास कमी होतो. या मशीनमुळे तरुण स्त्रियांना होणाऱ्या स्तन कर्करोगाचे प्रभावीपणे निदान करू शकतो. यासाठी एमआरआयची गरज भासणार नाही. त्यामुळे वेळ आणि खर्चात बचत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in