
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना लागले असून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने आणखी १८ विनाआरक्षित स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशभक्तांसाठी कोकणासाठी एकूण २६६ स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
१९ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून त्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सव कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने याआधी २०८ स्पेशल ट्रेन तर पश्चिम रेल्वेने ४० स्पेशल ट्रेन चालवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यात मध्य रेल्वेने आणखी १८ विनाआरक्षित स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणवासीयांना बाप्पा पावला, असे चित्र सध्यातरी आहे.
मुंबई-कुडाळ गणपती स्पेशल
०११८५ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवार, बुधवार आणि शनिवारी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत १२.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
०११८६ स्पेशल कुडाळहून येथून मंगळवार, गुरुवार आणि रविवारी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत १२.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या ठिकाणी थांबणार
ठाणे, पनवेल, रोहा, मंगोवन, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजपूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.