Mumbai : बेस्टखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

कुर्ला पश्चिमेकडील बुद्ध कॉलनी परिसरात बेस्टच्या बसखाली चिरडून स्कूटीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ७.१० वाजण्याच्या सुमाराला घडली.
Mumbai : बेस्टखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
Published on: 

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील बुद्ध कॉलनी परिसरात बेस्टच्या बसखाली चिरडून स्कूटीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ७.१० वाजण्याच्या सुमाराला घडली. टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूटीस्वाराचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला. त्याचवेळी मागून येणाऱ्या बेस्टच्या चाकांदरम्यान आल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

धारावी आगारातील मातेश्वरी वेट लीजची बस मंगळवारी सकाळी वांद्रे टर्मिनस पूर्व ते कुर्ला बस स्थानक पश्चिम या मार्गावर धावत होती. सकाळी सुमारे ७.१० वाजण्याच्या सुमारास बस बुद्ध कॉलनी परिसरात पोहोचली असता स्कूटीवरील चालकाने बसच्या उजव्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पुढे जाणाऱ्या टेम्पोला स्कूटीची धडक बसली आणि चालक रस्त्यावर कोसळला. दुर्दैवाने मागून येणाऱ्या बसच्या चाकांखाली तो आला.

अपघातानंतर बसच्या वाहकाने तत्काळ १०० क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी स्कूटीस्वाराला राजावाडी रुग्णालयात हलवले.

( इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)