Mumbai : कुर्ल्यात गणेश मूर्ती कोसळून तीन जखमी 

भुलेश्वर येथे गणेश मूर्ती कोसळण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी कुर्ला पश्चिम शीतल तलाव येथे गणेश मूर्ती कोसळण्याची घटना घडली. या घटनेत तीन कार्यकर्ते जखमी झाल्याचे समजते.
Mumbai : कुर्ल्यात गणेश मूर्ती कोसळून तीन जखमी 
Published on

मुंबई : भुलेश्वर येथे गणेश मूर्ती कोसळण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी कुर्ला पश्चिम शीतल तलाव येथे गणेश मूर्ती कोसळण्याची घटना घडली. या घटनेत तीन कार्यकर्ते जखमी झाल्याचे समजते. धारावी येथील प्रेमनगर मित्र मंडळाची गणेश मूर्ती विद्याविहार कुर्ला पश्चिम येथील नौपाडा परिसरातून धारावीत घेऊन जात असताना अपघात झाल्याचे समजते.

संतोष जयस्वाल  २८) आणि रोहित जयस्वाल (२५) हे दोघे किरकोळ जखमी झाले. संतोष जयस्वाल यांना कुर्ला भाभा रुग्णालयात, तर रोहित जयस्वाल यांना हबीब रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघांवर किरकोळ दुखापतींवर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

गणेश मूर्ती घेऊन नेणारी ट्रॉली अचानक अडकल्याने संतुलन बिघडले आणि गणेश मूर्ती रस्त्यावर कोसळली. स्थानिक नागरिकांच्या मते, ज्या ट्रॉलीवरून मूर्ती नेण्यात येत होती ती रस्त्यात अडकल्यामुळे ही घटना घडली. तर काहींनी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रॉलीचा तोल गेल्याचा आरोप केला आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मूर्ती कोसळल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिकांनी तत्काळ निर्णय घेत जवळील शीतल तलावात मूर्तीचे विसर्जन केले. दुर्घटनेनंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीसही सतर्क झाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in