
मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख तलावांमध्ये पावसाने जुलै महिन्यापर्यंत दमदार हजेरी लावली. मात्र, यावर्षी झालेला पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे समोर आले आहे. तसेच मागील काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने एकूण पाणीसाठ्यात किंचितशी घट झाली आहे. अशी आकडेवारी समोर आली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणापैकी अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मिडल वैतरणा आणि भातसा यांसारख्या मोठ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये आजमितीस ८९.२० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, गेल्यावर्षी याच दिवशी ९२.५५ टक्के पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध होता, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
यावर्षी विहार आणि तुळशी या दोन तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे. विहार तलावात यावर्षी २७२० मिमी पाऊस झाला, तर गेल्या वर्षी यावेळेत या तलावात २४०० मिमी पाऊस पडला होता. तर तुळशी तलावात यावर्षी ३३०९ मिमी पाऊस झाला असून गेल्या वर्षी ३३६३ मिमी पाऊस झाला होता.
दोन वर्षांतील पावसाची तुलनात्मक घट